टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सध्या न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा पुण्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकूण 4 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव या संघाचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (Border Gavskar Trophy) टीम इंडिया एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. टी 20i मालिकेत कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेण्याआधी आपण प्रतिष्ठेच्या आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने निर्णायक असणाऱ्या या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.
या मालिकेसाठी निवड समितीने एकूण 21 जणांनी निवड केली आहे. या 21 जणांपैकी 18 खेळाडूंचा मुख्य संघात समावेश आहे. तर 3 क्रिकेटपटू हे राखीव आहेत. राखीव खेळाडूंमध्ये मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि अभिमन्यू इश्वरन या तिघांची पहिल्यांदाच कसोटी क्रिकेमध्ये निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांची विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय केएल राहुल संघातील स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांचा स्पिनर म्हणून समावेश करण्यात आला आहे. या तिघांवर बॉलिंगसह बॅटिंगचीही जबाबदारी असणार आहे. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. प्रसिध याचं अनेक महिन्यांनी संघात कमबॅक झालं आहे. प्रसिधने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी पदार्पण केलं होतं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल या दोघांची विकेटकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याशिवाय केएल राहुल संघातील स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांचा स्पिनर म्हणून समावेश करण्यात आला आहे. या तिघांवर बॉलिंगसह बॅटिंगचीही जबाबदारी असणार आहे. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. प्रसिध याचं अनेक महिन्यांनी संघात कमबॅक झालं आहे. प्रसिधने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी पदार्पण केलं होतं.
अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांना या दौऱ्यासाठी संधी देण्यात आलेली नाही. अक्षर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i मालिकेत खेळणार आहे. तर कुलदीप यादवला दुखापतीशी झुंजत असल्याने तो एनसीएत कमबॅकसाठी तयारी करत आहे.
बॉर्डर गावस्कर या प्रतिष्ठेच्या मालिकेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही वेळा अंतिम फेरीत पोहचली आहेत. भारताला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे.
दरम्यान या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना हा डे नाईट असणार आहे.
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया
All the details of #TeamIndia’s squad announcement for tour of South Africa & Border-Gavaskar Trophy 🔽#SAvIND | #AUSvINDhttps://t.co/EW5yZdsHcj
— BCCI (@BCCI) October 25, 2024
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.