INDvsAUS | रोहित-विराट यांना भेटण्याची सुवर्णसंधी, फक्त 315 रुपयात स्वप्न पूर्ण होणार!

| Updated on: Feb 25, 2023 | 5:52 PM

आपल्या आवडत्या क्रिकेटरला जवळून पाहता यावं, अशी प्रत्येक चाहत्यांची इच्छा असते. मात्र कुणाची ती इच्छा इच्छाच राहते. तर कुणाचं ते स्वप्न पूर्ण होतं.

INDvsAUS | रोहित-विराट यांना  भेटण्याची सुवर्णसंधी, फक्त 315 रुपयात स्वप्न पूर्ण होणार!
Follow us on

इंदूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने पाहुण्या कांगारुंचा नागपूर आणि दिल्ली कसोटीत मोठ्या फरकाने पराभव केला आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. आता तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्वाचा सामना आहे. यासाठी भारतीय खेळाडू नेट्समध्ये जोरदार सराव करत आहेत. त्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

आपल्या आवडत्या क्रिकेटरला जवळून पाहता यावं, अशी प्रत्येक चाहत्यांची इच्छा असते. मात्र कुणाची ती इच्छा इच्छाच राहते. तर कुणाचं ते स्वप्न पूर्ण होतं. जर तुम्हाला पण आवडत्या क्रिकेटरला भेटायचं असेल, तर संधी चालून आली आहे.

फक्त 315 रुपये

होळकर स्टेडियममध्ये सर्वात स्वस्त तिकीटाची रक्कम ही फक्त 315 रुपये इतकी आहे. थोडक्यात काय तर स्टेडियममध्ये बसून तुम्हाला रोहित, विराट आणि इतर खेळाडूंना जवळून पाहण्याची संधी आहे. क्रिकेट चाहते हे तसेही स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्यासाठी उत्सूक असतात. होळकर स्टेडियममधील सर्वात महागडं तिकीटाची किंमत ही 2 हजार रुपयांच्या आसपास आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियासाठी निर्णायक सामना

टीम इंडियाला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. तसेच या विजयासह टीम इंडिया ही मालिका जिंकेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही पोहचेल. इतकंच नाही, तर तिसरा सामना जिंकला, तर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा पोहचणारी टीम ठरेल.

विराटसाठी लकी मैदान

विराट कोहली याच्यासाठी होळकर स्टेडियम फार लकी ठरला आहे. विराटने या स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरुद्ध 2016 साली 211 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीतही क्रिकेट चाहत्यांना विराटकडून अशाच प्रकारची खेळी अपेक्षित असणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.