मुंबई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एका डावाने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाचा हा विजय विशेष ठरला, कारण टीम इंडियाने अडीच दिवसातच धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सामना निकाली काढला. भारतीय संघाने या विजयासह 4 सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 1-0 अशी आघाडी घेतली. अंजिक्य रहाणे याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात 2-1 अशा फरकाने हीच ट्रॉफी जिंकवली होती. मात्र तोच अजिंक्य आता वर्षभरापासून टीममधून बाहेर आहे.
अजिंक्यने रणजी करंडकात उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 सामन्यांमध्ये निवड समिती संधी देणार का, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला. आता टीम इंडिया पहिला सामना जिकंलीय. तर दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये 17 ते 21 फेब्रुवारी पार पडणार आहे. त्यामुळे लवकरच बीसीसीआयकडून उर्वरित 2 कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर होणं अपेक्षित आहे.
अंजिक्य एकेवेळी टीम इंडियाचा कर्णधार राहिलाय. मात्र आता तो टीममधून बाहेर आहे. अजिंक्य अखेरचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध जानेवारी 2022 मध्ये खेळला होता. अजिंक्यने त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कामगिरीने आपली छाप सोडली. यासह अजिंक्यने उर्वरित 2 सामन्यांसाठी आपली दावेदारी ठोकली आहे.त्यामुळे निवड समिती अजिंक्यवर विश्वास दाखवून त्याला 1 वर्षानंतर कमबॅकची संधी देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
अजिंक्यने एकूण 82 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंजिक्यने 140 डावांमध्ये 12 शतकं आणि 25 अर्धशतकांच्या मदतीने 4 हजार 931 धावा केल्या आहेत.
अजिंक्यने त्याच्या कसोटी कारकीर्दीत एकूण 6 सामन्यांमध्ये कॅप्टन्सी केलीय. उल्लेखनीय बाब अशी की टीम इंडियाचा 6 पैकी एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. अजिंक्यने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 4 सामन्यात विजय मिळवून दिलाय. तर 2 सामने ड्रॉ राहिले आहेत.
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.