मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 1-5 मार्च दरम्यान पार पडणार आहे. टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा अतिशय महत्वाचा सामना आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी आणखी एक विजय आवश्यक आहे.टीम इंडियाने इंदूर कसोटी जिंकली तर रोहितसेनेच्या नावावर अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड होईल.
तिसरा कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडियाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होईल. यासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दुसऱ्यांदा पोहचणारी पहिली टीम ठरेल. टीम इंडियाने याआधी 2021 मध्येही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.
टीम इंडियाचं तेव्हा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा न्यूझीलंडने फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता. दरम्यान आता वर्ल्ड चॅम्पियनशीपमधून न्यूझीलंडचंही आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे टीम इंडियाला यंदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे.
दरम्यान टीम इंडियाचा गेल्या काही वर्षांपासून टेस्ट रँकिंगमध्ये दबदबा पाहायला मिळतोय. टीम इंडिया रँकिंगमध्ये सातत्याने दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने याआधी विराट कोहली याच्या नेतृत्वात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत पराभव केला होता. तेव्हा टीम इंडिया विराटच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळली होती.
आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची संधी आहे. टीम इंडियाकडे फायनलमध्ये विजय मिळवून वर्ल्ड चॅम्पियन होण्याची कामगिरी करण्याची नामी संधी आहे. टीम इंडियाने ही कामगिरी केली, तर टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमधील आयसीसी ट्रॉफी जिंकणारी एकमेव टीम ठरेल.
उर्वरित कसोटी मालिकेचं वेळापत्रक
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर
चौथी कसोटी, 9-13 मार्च,
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.