Video : IND vs AUS माहीचा ‘तो’ गुण पोरांनी घेतलाच, रोहित शर्मा याने ट्रॉफी घेतली पुढे पाहा काय केलं!

| Updated on: Mar 13, 2023 | 7:11 PM

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दिली. मात्र त्यानंतर रोहितने जे केलं त्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा!

Video : IND vs AUS  माहीचा तो गुण पोरांनी घेतलाच, रोहित शर्मा याने ट्रॉफी घेतली पुढे पाहा काय केलं!
Follow us on

मुंबई : टीम इंडियाने बॉर्डर गावसकर मालिका आपल्या खिशात घातली आहे. अंतिम आणि चौथा सामना ड्रॉ झाला मात्र न्यूझीलंड संघाने श्रीलंकेचा केलेला पराभव करत भारताचं फायनलटं तिकीट कन्फर्म करून दिलं. मॅच झाल्यानंतर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्माला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दिली. कर्णधार रोहितने ट्रॉफी युवा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि केएस भरत यांना दिली. दोघांनीही मालिकेमध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने ट्रॉफी दिल्यावर सर्व सीनिअर खेळाडू दोन्ही बाजूला उभे राहिलेले दिसले.

 

रोहितने ट्रॉफी दिल्यावर मधोमध सूर्यकुमार यादव, केएस भरत, शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि इशान किशन हे युवा खेळाडू उभे होते. हे पाहून नेटकऱ्यांना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली आहे. धोनी कर्णधार असताना कोणताही ट्रॉफी जिंकली की तो संघातील युवा खेळाडूंकडे द्यायचा आणि एका बाजूला उभा राहिलेला दिसायचा. माहीचा हा स्वभाव क्रीडा वर्तुळातील जगताला माहित आहे.

युवा खेळाडूंचाही याने आत्मविश्वास वाढतो आणि जबाबदारीने ते संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतात. रोहित आणि कोहली संघात युवा असताना कित्येकवेळा त्यांच्याकडे धोनीने ट्रॉफी दिली आहे. धोनीनंतर कोहलीनेसुद्धा हा गुण आत्मसात केला आणि युवा खेळाडूंकडे त्याने ट्रॉफी सोपवली.

चार सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने पहिले दोन कसोटी सामने जिंकले होते. तर इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली असली तरी भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिप फेरीमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल. त्याचवेळी, आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. कारण सामन्यवेळी पाऊस हजेरी लावू शकतो म्हणून हा दिवस राखीव ठेवला आहे.