Video : Yes..No..! ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील कन्फ्यूजने गेली विकेट, तुम्हीच सांगा चूक कोणाची?

| Updated on: Nov 23, 2023 | 9:35 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 सीरिज सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 3 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात यशस्वी आणि ऋतुराज यांच्यात संवादाचा अभाव दिसला.

Video : Yes..No..! ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांच्यातील कन्फ्यूजने गेली विकेट, तुम्हीच सांगा चूक कोणाची?
Video : भारतीय खेळाडूंना नेमकं झालं तरी काय? ऋतुराज-यशस्वी यांच्यात चुकलं काय? रनआऊट झाला कोणामुळे?
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिस याने जबरदस्त खेळी केली. स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावा, जोस इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 षटकात 3 गडी गमवून 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड जोडी मैदानात उतरली. यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली. पण यशस्वी आणि ऋतुराज यांच्यात तालमेल नसल्याचं दिसून आलं आहे. कारण एका चुकीमुळे ऋतुराज गायकवाडची विकेट गेली. ऋतुराज गायकवाडला एकही चेंडू खेळता आला नाही. दोन धावा घेण्याच्या नादात ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला. पण ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ऑस्ट्रेलियाकडून तिसरं षटक मॅथ्यू शॉर्ट याने टाकलं. पहिल्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर ऑफ साईडला मारला आणि एक धाव पूर्ण केल्यावर दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. मग काय यशस्वीच्या कॉलनंतर ऋतुराजने क्रिज सोडलं. पण झालं असं की यशस्वीने निर्णय बदलला आणि दोन्ही खेळाडू खेळपट्टीच्या मधोमध आले. त्यामुळे स्मिथने विकेटकीपरच्या दिशेने बॉल फेकला आणि रनआऊट झाला. त्यामुळे ऋतुराजला एकही चेंडू न खेळता तंबूत परतावं लागलं.

सोशल मीडियावर या विकेटची चर्चा रंगली आहे. अनेक जण ऋतुराजच्या विकेटसाठी यशस्वीला जबाबदार धरत आहेत. कारण यशस्वीने एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता. पण चेंडू हातात असल्याचं पाहून निर्णय बदलला आणि ऋतुराजला विकेट गमवावी लागली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा

भारत (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा