मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : क्रिकेटची मॅच पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. एखादा फोर-सिक्स पाहताना आनंदाला पारावार राहात नाही. एखादा आपल्या टीमच्या बॅट्समनने मारलेला फोर जेव्हा फिल्डर कॅच घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तर हृदयाची धकधक कैक पटींने वाढते. पण ही मॅच आणि त्यातील हे ‘कॅची’ क्षण आपल्यापर्यंत पोचवतो तो कॅमेरा… मॅच पाहताना बो बॉल कोणत्याही दिशेने गेला तरी तो क्षण अचूक टिपला जातो… त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की मॅचच्या वेळी स्टेडियममध्ये किती कॅमेरे असतात? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात…
जेव्हा एखाद्या स्टेडियममध्ये मॅच खेळली जाते. तेव्हा त्या मॅचमधील एक ना एक क्षण क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी तब्बल 30 कॅमेरे कार्यरत असतात. हे कॅमेरे मॅचमधला प्रत्येक रोमांचित करणारा प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नेमके कोणकोणत्या ठिकाणी कॅमेरे लावलेले असतात? तर ब्रॉडकास्टिंग स्टुडिओसाठी 1 कॅमेरा, फील्ड प्ले कव्हर करण्यासाठी 12 कॅमेरे, 4-स्टंप कॅमेरे, 1- प्रेझेंटेशन कॅमेरा, 6-हॉकआई कॅमेरे,रन-आउट व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी 4 कॅमेरे, स्ट्राइक झोन कॅप्चर करण्यासाठी 2 कॅमेरे असतात.
हा क्रिकेट मॅचमधील महत्वाचा कॅमेरा असतो. ज्याला स्टेडियममध्ये व्यवस्थित इन्स्टॉल केलेला असतो. हा कॅमेरा वाईड अँगल शॉट कॅप्चर करतो. यामुळे मॅचचा ओव्हरऑल व्हिव मिळतो.
बाऊंडरी कॅमेरा हा बाऊंडरी लाईन जवळ असतो. हा कॅमेरा फिल्डिंग अॅक्शन आणि क्लोजअप शॉट कॅप्चर करण्यासाठी वापरला जातो. खेळाडूंच्या हालचाली हा कॅमेरा टिपतो. एखादी विकेट घेतली गेली तर होणारा जल्लोष या कॅमेरात टिपला जातो.
स्टंपमध्येही कॅमेरा सेट केलेला असतो. या कॅमेऱ्याने बॉलर, बँट्समन आणि विकेटकीपर यांच्या मुव्हमेंट या कॅमेऱ्यात कैद होतात.
स्पायडर कॅमेरा… जसं या कॅमेऱ्याचं नाव आहे. तसंच त्याचं कामही आहे. हा कॅमेरा उभा आणि आडवा फिरून मुव्हमेंट कॅपचर करू शकतो. यामुळे एरियल शॉट्स मिळतात.
एखाद्या वेळी फलंदाज आऊट झाला किंवा नाही हे पाहण्यासाठी रिव्ह्युव मागितला जातो. तेव्हा अल्ट्रा स्लो- मोशन कॅमेऱ्याच्या मदतीने कॅप्चर केलेल्या शॉट्सच्या मदतीने ते पाहिले जातात.
बॅटिंग करताना बॅट्समन हेल्मेट घालतात. त्यात कॅमेरा असतो. त्यामुळे मॅचचा फर्स्ट पर्सन व्यूव मिळतो. यामुळे बॉलरच्या हालचाली कॅप्चर होतात. बॅट्समनच्या ठिकाणाहून मॅचचा आनंद यामुळे घेता येतो.
रोबोटिक कॅमेरा हे रिमोटने कंट्रोल केले जातात. यामुळे फ्लेक्सिबल आणि अॅडजेस्टेबल अँगलचा व्यूह मिळतो.