IND vs AUS | सौम्य पांडेचा कारनामा, अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये रचला इतिहास

| Updated on: Feb 11, 2024 | 7:25 PM

Saumy Pandey | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 मध्ये टीम इंडियाच्या सौम्य पांडे याने इतिहास रचला आहे. सौम्य पांडे टीम इंडियासाठी अशी कामगिरी करणारा पहिलावहिला गोलंदाज ठरला आहे.

IND vs AUS | सौम्य पांडेचा कारनामा, अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये रचला इतिहास
Follow us on

बिनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 सामन्यात टीम इंडियाच्या सौम्य पांडे याने इतिहास रचला आहे. सौम्य पांडे टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. सौम्य पांडे अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. सौम्य पांडे याने टीम इंडियाचा स्पिनर रवी बिश्नोई याला मागे टाकत हा कारनामा केला आहे.

सौम्य पांडे याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकमेव विकेट घेतली. मात्र सौम्यने घेतलेली विकेट ही टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरली. सौम्यने धोकादायक ठरत असलेल्या हरजस सिंह याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सौम्यने हरजसला 55 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. हरजस सौम्यची या वर्ल्ड कपमधील 18 वी शिकार ठरला. सौम्यने यासह इतिहास रचला. सौम्यने यासह रवी बिश्नोई याला मागे टाकत टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. रवी बिश्नोई याने 2020 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या.

टीम इंडियासाठी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स

सौम्य पांडे, 18 विकेट्स, 2024

रवी बिश्नोई, 17 विकेट्स, 2020

अभिषेक शर्मा, 14 विकेट्स, 2002

कुलदीप यादव, 14 विकेट्स, 2014

अनुकूल रॉय, 14 विकेट्स, 2018

सौम्य पांडे याने रचला इतिहास

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.