अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्याचा थरार रंगणार आहे. 19 नोव्हेंबरला हा सामना होणार आहे. तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व 9 सामने जिंकले आहेत. तर उंपात्य सामन्यात न्यूझीलंडलला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक अशी सुरुवात राहिली.
ऑस्ट्रेलियाला सलग 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने आपल्या पहिल्याच सामन्यात कांगारुंना पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने कांगारुंवर विजय मिळवला. मात्र ऑस्ट्रेलिया त्यानंतर सलग 7 सामने जिंकून सेमी फायलनमध्ये पोहचली. ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मात करत साखळी फेरीतील पराभवाचा वचपा घेतला. तसेच फायनलमध्ये एन्ट्री केली. आता या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनी पुन्हा एकदा टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होणार आहे. या निमित्ताने या दोन्ही संघांची वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकमेकांसमोर आकडे कसे राहिले आहेत, हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकूण 13 वेळा आमनेसामने आले. वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 13 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 5 वेळा कांगारुंना चितपट केलंय.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.