चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपमधील पाचवा सामना खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजांला टीम इंडियाच्या फिरकी आणि वेगवान माऱ्यासमोर टिकता आलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या आधीच रोखलं. ऑस्ट्रेलिया 49.3 ओव्हरमध्ये 199 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी राउंड फिगर 200 रन्सचं टार्गेट मिळालं आहे. आता टीम इंडियाच्या फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचा कसा सामना करतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या विकेटसाठीच्या 69 धावांचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या धारदार बॉलिंगसमोर कांगारुंना टिकता आलं नाही. जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. शॉन मार्श याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथन या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. पण कुलदीप यादव याने ही जोडी फोडून काढली. कुलदीपने वॉर्नरला 41 धावांवर आपल्याल बॉलिंगवर कॅच आऊट केलं.
त्यानंतर रविंद्र जडेजा याने ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरचा कार्यक्रम केला.जडेजाने आपल्या 2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. जडेजाने आधी स्टीव्हन स्मिथ याला 46 धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर त्याच्या स्पेलमधील पुढील ओव्हरमध्ये मार्नस लबुशेन 27 आणि एलेक्स कॅरी या झिरोवर आऊट केलं. जडेजाने एकाच ओव्हरमध्ये या दोघांना आऊट करत मिडल ऑर्डरचा कणा मोडला. त्यानंतर कुलदीप यादव याने मॅक्सवेल याला 15 धावांवर आऊट केलं.
जसप्रीत बुमराह याने कॅमरुन ग्रीन याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ग्रीनने 8 धावा जोडल्या. कॅप्टन पॅट कमिन्स याला जसप्रीत बुमराह याने 15 धावांवर बाद केलं. एडम झॅम्पाला हार्दिक पंड्या याचा काटा काढला. मात्र मिचेल स्टार्क याने अखेरपर्यंत टिकून चिवट खेळी केली. मात्र स्टार्क मोठा फटका मारताना कॅच आऊट झाला. स्टार्कने अखेरीस 28 धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला टीम इंडियासमोर 200 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवता आलं.
टीम इंडियाकडून बॉलिंग टाकलेल्या सहाच्या सहा गोलंदाजांनी किमान 1 विकेट घेतली. टीम इंडियाकडून रविंद्र जडेजाने या सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.