अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 47 सामन्यांनंतर अखेर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भिडणार आहेत. टीम इंडियाने पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या 2019 सेमी फायनलचा वचपा घेतला. तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत मजल मारली. ऑस्ट्रेलियाची ही अंतिम फेरीत पोहचण्याची आठवी वेळ ठरली. तर टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ आहे. या फायनल निमित्ताने आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना रविवारी 19 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर डीडी स्पोर्ट्सवर फुकटात सामना पाहायला मिळेल.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.