IND vs AUS | “विराट-केएल या दोघांना…”, रोहित शर्मा याची प्रतिक्रिया व्हायरल

| Updated on: Oct 08, 2023 | 11:20 PM

Rohit Sharma On Virat kohli And K L Rahul | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा अपयशी ठरला. त्याला भोपळही फोडता आला नाही. मात्र तो विराट कोहली आणि केएल राहुल यांच्याबाबत काय म्हणाला जाणून घ्या.

IND vs AUS | विराट-केएल या दोघांना..., रोहित शर्मा याची प्रतिक्रिया व्हायरल
Follow us on

चेन्नई | भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार आणि जोरदार अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्या सामन्यात 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आधी टीम इंडियाने चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाला 49.3 ओव्हरमध्ये 199 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 41.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाची 200 धावांचा पाठलाग करताना अत्यंत वाईट सुरुवात झाली. ईशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघे झिरोवर आऊट झाले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी झुंज देत विजयश्री खेचून आली.

विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी 165 रन्सची पार्टनरशीप केली. या निर्णायक भागीदारीमुळे टीम इंडिया विदयी झाली. टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक नाबाद 97 धावा केल्या. तर विराट कोहली याने 85 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली. रोहित नक्की काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

रोहित काय म्हणाला?

“सर्व काही रोमहर्षक होतं. जिंकून चांगलं वाटतंय. अशा स्पर्धेची सुरुवात करणं चांगलं आहे. आम्ही उत्तम फिल्डिंग केली. सर्वच खेळाडूंनी प्रयत्न केले. गोलंदाजांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. आम्हाला माहिती होतंच की खेळपट्टी मदतशीर ठरेल. स्पिनर्सेनेही चांहली बॉलिंग केली. एकूणच हा चांगला प्रयत्न होता. आम्ही 3 विकेट्स गमावल्या तेव्हा नाराज होतो. कुणीही आपल्या डावाची सुरुवात अशी करुन इच्छिणार नाही. याचं संपूर्ण श्रेय हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचं आहे. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल या दोघांनी शानदार खेळ दाखवला. दोघांनी मॅचविनिंग पार्टनरशीप केली. आम्हाला येत्या काही दिवसात वेगवगेळ्या परिस्थितीशी तोंड द्याव लागेल” असं रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणाला.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.