चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला सलामीचा सामना खेळणार आहेत. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे कांगारुंची धुरा आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र या पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू हा आजारपणामुळे बाहेर झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
टीम इंडियाचा आघाडीचा आणि मॅचविनर फलंदाज शुबमन गिल हा दुखापतीमुळे नाही, तर आजारपणामुळे बाहेर झालाय. शुबमन गिल याला पहिल्या सामन्याच्या काही दिवसांआधी डेंग्युची लागण झाली. या डेंग्युने शुबमन गिल याची विकेट काढली. आता शुबमन गिल पहिल्या सामन्यात नसल्याने त्याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन असलेल्या डावखुऱ्या ईशान किश याला संधी दिली आहे. ईशान किशन रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंग करणार आहे. यामुळे टीम इंडियाची लेफ्ट राईड कॉम्बिनेशन होईल.
दरम्यान टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध आहे. तर तिसरा सामना हा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा सामना आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी शनिवारी पाकिस्तान विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. शुबमनने या स्टेडियममध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. अनेक रेकॉर्ड्स शुबमनने इथे केले आहेत. त्यामुळे आता शुबमन कधीपर्यंत डेंग्युवर मात करत कमबॅक करतो, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.