Vodeo : सामना जिंकून टीम इंडियाने वेळ सार्थकी लावला, ‘या’ ठिकाणी घालवला वेळ…

| Updated on: Feb 19, 2023 | 10:57 PM

ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय क्रिकेट संघाने आपला सगळा वेळ राजधानीतील पंतप्रधान संग्रहालयाला भेट देण्यासाठी घालवला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या वारशाबद्दल माहिती जाणून घेणं, आणि ते उत्सुकते पाहणे यामध्येच त्यांनी खरा वेळ घालवला.

Vodeo : सामना जिंकून टीम इंडियाने वेळ सार्थकी लावला, या ठिकाणी घालवला वेळ...
Follow us on

नवी दिल्लीः कधी कधी एखादे काम वेळेत संपले तर त्यासारखा दुसरा आनंद नसतो. त्या उरलेल्या वेळेत मग आवडीनुसार काहीही आणि कोणतही काम मग आवडीनं करता येतं, वाटलं तर आरामही करता येतो आणि चित्रपटही पाहता येतो. आणि कामाच्या वेळी तुम्ही जर दिल्लीत असाल तर मात्र तुमचे काम लवकर आटोपलं तर मात्र तुम्ही नक्कीच पंतप्रधानांच्या संग्रहालयालाही भेट देण्याचा तु्म्ही विचार करू शकता. त्यामुळे यावेळी टीम इंडियानेही तेच केले आहे.

अवघ्या अडीच दिवसामध्ये दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय क्रिकेट संघाने आपला सगळा वेळ राजधानीतील पंतप्रधान संग्रहालयाला भेट देण्यासाठी घालवला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या वारशाबद्दल माहिती जाणून घेणं, आणि ते उत्सुकते पाहणे यामध्येच त्यांनी खरा वेळ घालवला.

 

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 17 फेब्रुवारीपासून सुरू झालेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना रविवारी 19 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात संपला.

त्यानंतर भारतीय संघाला विजयासाठी 115 धावांची गरज होती. मात्र यावेळी भारतीय संघाने जोरदार खेळ करत त्यांनी ती पूर्ण केली. आणि मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली.

 

नागपुरात खेळली गेलेली पहिली कसोटीही टीम इंडियाने अडीच दिवसांतच जिंकली होती. त्यामुळे अशाप्रकारे सलग दुसरी कसोटी मॅच पूर्ण पाच दिवसही चालू शकली नाही.

आता तिसरी कसोटी 1 मार्चपासून सुरू होणार आहे, त्याआधी टीम इंडियाला अडीच दिवसांचा अतिरिक्त ब्रेक मिळाला आहे. भारतीय टीम सध्या राजधानीत असल्याने त्याचा फायदा संघाने घेतला.

या संधीचा फायदा घेत खेळाडूंनी पंतप्रधान संग्रहालयाला भेट दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ट्विटर अकाऊंटवरु ही माहिती दिली आहे.

त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ संग्रहालयामध्ये दिसला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचे 14 एप्रिल 2022 रोजी उद्घाटन झाले होते. हे संग्रहालय नवी दिल्लीतील तीन मूर्ती भागात आहे.

जे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान होते. त्यामध्ये देशाच्या सर्व 15 पंतप्रधानांची माहिती, त्यांच्याशी संबंधित वस्तू आणि इतर वस्तुही या संग्रहालयाल भेट देणाऱ्यांना पाहता येतात.