KL Rahul Virat Kohli जोडीची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड

| Updated on: Oct 09, 2023 | 9:19 AM

KL Rahul and Virat Kohli | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात टीम इंडिया खिंडीत सापडली होती. मात्र केएल आणि विराट या जोडीने टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका बजावत कांगारुंचा हल्ला परतावून लावला.

KL Rahul Virat Kohli जोडीची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा रेकॉर्ड
Follow us on

चेन्नई | भारतीय क्रिकेट संघाने विश्व चषक 2023 मोहिमेची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला 6 विकेट्सने उपट दिली. कांगारुंनी टीम इंडियासमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा हा 1992 नंतर वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यातील पराभव ठरला. विराट कोहली आणि केएल राहुल ही जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. या दोघांनी 200 धावांच्या आव्हानचं पाठलाग करताना रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएल-विराट या जोडीने 24 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

नक्की रेकॉर्ड काय?

केएल आणि विराट या दोघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही विकेट्साठी विक्रमी शतकी भागीदारी केली. अशी कामगिरी करणारी विराट-केएल ही पहिलीच भारतीय जोडी ठरली. टीम इंडियान 200 धावांचा पाठलाग करायला उतरली. तेव्हा टीम इंडियाने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. ईशान किशन, कॅप्टन रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे तिघेही झिरोवर आऊट झाले. मात्र त्यानंतर केएल आणि विराट या जोडीने टीम इंडियाा डगमगलेला डाव सावरला. वैयक्तिक अर्धशतकं झळकावत टीम इंडियाला विजयी केलं.

विक्रमी भागीदारी

विराट याने 116 बॉलमध्ये 85 धावांची खेळी केली. तर केएल राहुल 97 धावा करुन नाबाद परतला. केएलच्या या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकांरांचा समावेश होता. विराट आणि केएल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 215 बॉलमध्ये 165 रन्सची पार्टनरशीप केली. टीम इंडियाकडून कांगांरु विरुद्ध वर्ल्ड कप इतिहासातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. केएल आणि विराट या दोघांनी 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

टीम इंडियाकडून वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वोच्च भागीदारी


टीम इंडियाकडून याआधी 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये रॉबिन सिंह आणि अजय जडेजा या जोडीने 148 धावांची नाबाद भागीदारी केली होती. तर 2019 च्या विश्व चषकात रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांनी 127 रन्सची पार्टनरशीप केली होती.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.