मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने पूर्ण झाले आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. हा सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. पण स्पर्धेत एक वेळ अशी होती की भारताचं काय खरं नाही. ऑस्ट्रेलियाने 199 धावा करत भारतासमोर विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. भारत हे आव्हान सहज गाठेल अशी स्थिती होती. पण पहिल्या दोन षटकात असं काही घडलं की, मैदानात भारतीय प्रेक्षकांना आवाज गप्प झाला. काही क्षणात तीन दिग्गज खेळाडू तंबूत परतले. तिन्ही फलंदाज शू्न्यावर बाद होत तंबूत परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर मैदानात फक्त हजेरी लावून तंबूत परतले. संघाच्या अवघ्या 2 धावा असताना दिग्गज खेळाडू बाद झाले. त्यामुळे सर्वस्वी जबाबदारी केएल राहुल आणि विराट कोहली यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी ही जबाबदारी योग्यरित्या सांभाळली.
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या 165 धावांची भागीदारी झाली. केएल राहुल याने सामन्यानंतर सांगितलं की, अंघोळ करून ड्रेसिंग रुममध्ये बसलो होती आणि आराम करायला जाणार होतो. पण तेव्हाच तीन विकेट पडले आणि फलंदाजीसाठी उतरावं लागलं. विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीबाबत केएल राहुल यान सांगितलं. मैदानात उतरलो तेव्हा विराट सोबत काही खास चर्चा झाली नाही. फक्त त्याने क्रिझवर वेळ काढण्यास सांगितलं होतं.
An incredible 97* in the chase when the going got tough 👏👏
KL Rahul receives the Player of the Match award as #TeamIndia start #CWC23 with a 6-wicket win 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #TeamIndia | #MeninBlue pic.twitter.com/rY7RfHM1Bf
— BCCI (@BCCI) October 8, 2023
“आमच्यात तशी काही खास चर्चा झाली नाही. मी अंघोळ करून ड्रेसिंग रुममध्ये बसलो होतो आणि फलंदाजीसाठी उतरावं लागलं. मी सुरुवातीला सांभाळून खेळत होतो. विराटने मला रिस्की शॉट्स खेळण्याऐवजी टेस्ट क्रिकेटसारखं खेळण्यास सांगितलं.”, असं केएल राहुल याने सांगितलं.
“सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. पण नंतर दव पडल्याने फलंदाजी सोपी झाली. या दरम्यान शतकाचा विचार केला होता. यासाठी शेवटी चांगली फटकेबाजी केली. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क होत होता. पण शतक पूर्ण झालं नाही पण त्याचं काही दु:ख नाही. पुन्हा शतक करेन.” असंही केएल राहुल याने सांगितलं. केएल राहुल याने षटकार मारून सामना जिंकवला.