मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना सुरु आहे. पाटा विकेट असल्याने भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात विकेट घेत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सपाट खेळपट्टीमुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण आहे. अशा स्थितीत चांगलं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे. एक चूक संघाला महागात पडू शकते. डेविड वॉर्नरच्या बाबतीत तसंच काहीसं घडलं. शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने वॉर्नरचा झेल सोडला. तेव्हा तो 14 धावांवर होता. मग काय संधीचं सोनं करत वॉर्नरने अर्धशतक झळकावलं. अशीच चूक मार्नस लाबुशेनच्या बाबत झाली. पण यावेळी झेल नाही तर सोपा रनआऊट सोडला आणि जीवदान मिळालं.
संघाचं 23 वं षटक कर्णधार केएल राहुल याने रवींद्र जडेजाकडे सोपवलं. पहिल्या चेंडूवर लाबुशेननं कव्हरच्या दिशेने चेंडू फटकावला. पण सूर्यकुमार यादव याने उडी घेत चेंडू अडवला. दुसरीकडे, लाबुशेन अर्ध्यात धावत आला. बाद होईल अशी शक्यता वाटल्याने ग्रीनने रन घेण्यास नकार दिला. त्यामुळे लाबुशेनला माघारी जाण्यास बराच वेळ होता. सूर्यकुमार यादव याने केएल राहुलच्या दिशेने चेंडू फेकला. पण त्याला हा चेंडू पकडण्यात अपयश आलं आणि लाबुशेनला जीवदान मिळालं. यावेळी लाबुशेन 11 धावांवर खेळत होता.
एक था जो wickets के पीछे से game बदल देता था। एक ये विकेटकीपर,batsman, captain साहेब हैं। #Dhoni #KLRahul #INDvsAUS pic.twitter.com/77jSY6mxgI
— Nihilistic (@NihilisticDr) September 22, 2023
Is team india worried that Ausies may not put a big score 🤔giving chances first dropping a simple catch by Shreyas and now a straight forward run out chance of Labuschagne 😭😭#IndvAus #IndvsAus #KLRahul #RohitSharma #ViratKohli #squad pic.twitter.com/GlBvMp24if
— DaebakAnkita💃 (@DaebakankitaF) September 22, 2023
ऑस्ट्रेलियाने 26 षटकांचा खेळ होईपर्यंत 3 गडी गमवून 131 धावा केल्या होत्या. मिचेल मार्श 4 धावा, डेविड वॉर्नर 52 आणि स्टीव्ह स्मिथ 41 धावा करून तंबूत परतला. तर मार्नस लाबुशेन आणि कॅमरॉन ग्रीन खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीने 2, तर रवींद्र जडेजाने 1 गडी बाद केला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी