IND vs AUS : टीम इंडिया ऑल आऊट पण ‘हे’ 3 चुकीचे निर्णय विसरणार नाही

| Updated on: Mar 01, 2023 | 7:05 PM

आजच्या सामन्यामध्ये भारताचे पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या 3 चुकीच्या निर्णयांमुळे आजचा दिवस चांगलाच चर्चेत राहिला.

IND vs AUS : टीम इंडिया ऑल आऊट पण हे 3 चुकीचे निर्णय विसरणार नाही
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी कांगारूंच्या संघाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिला दिवस कांगारूंच्या स्पिनर्सने गाजवला. एकट्या मॅथ्यू कुह्नमैनने 5 विकेट्स घेत भारताचा अर्धा संघ माघारी पाठवला. भारताला पहिल्या डावात 109 धावांवर ऑल आऊट करत ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्स गमावत 156 धावा करत 47 धावांची आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या सर्व विकेट्स जडेजाने घेतल्या. आजच्या सामन्यामध्ये भारताचे पंच नितीन मेनन यांनी दिलेल्या 3 चुकीच्या निर्णयांमुळे आजचा दिवस चांगलाच चर्चेत राहिला.

पंच नितीन मेनन यांनी दिलेले 3 चुकीचे निर्णय

तिसऱ्या कसोटीमधील पहिलाच चेंडू, रोहित शर्मा स्ट्राईकला होता तर ऑस्ट्रेलियाचा घातक मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. या चेंडूवर रोहित पुर्णपणे फसला आणि बिट झाला. चेंडू थेट कीपर अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला. यावर स्टार्कने अपील केलं होतं. मात्र पंच नितीन मेनन यांनी नाबाद निर्णय दिला. कर्णधार स्टीव्ह स्मिथनेही डीआरएसचा वापर केला नाही. जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे दिसत होतं की चेंडू बॅटची कडा घेऊन गेला होता.

इतकंच नाहीतर पुन्हा एकदा स्टार्कच्या त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर परत एकदा रोहित फसला. रोहितला काही अंदाज आला नाही अन् तो बिट झाला. पंचांनी तेव्हाही नाबाद निर्णय दिला, तेव्हाही स्मिथनेही डीआरएसचा वापर केला नाही. याचा रिप्लेमध्ये दखवण्यात आलं तरत्यामध्ये रोहित शर्मा बाद असलेलं दिसून आलं.

तिसरा निर्णय म्हणजे 11 व्या षटकामध्ये नॅथन लायनचा चौथ्या चेंडू टाकत होता. त्यावेळी भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा स्ट्रईकवर होता आणि हा चेंडू जडेजाच्या पॅड लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केलं त्यावर मेनन यांनी बाद निर्णय दिला. त्यानंतर मात्र जडेजाने डीआरएस घेतल्यावर चेंडू बॅटची कडा घेऊन पॅडला लागल्याचं दिसून आलं. मेनन यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

 

दरम्यान अशा प्रकारे नितीन मेनन यांचे तीनही निर्णय चुकीचे ठरले. यानंतर त्याला सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जाऊ लागले. दिल्ली कसोटीत विराट कोहलीसोबत असेच काहीसे घडले होते. दिल्लीमध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहलीला देण्यात आलेल्या निर्णयावरूनही ते वादात सापडले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.