मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांची आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधीची अखेरची मालिका आहे. तसेच हे दोन्ही संघ वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोघांसाठी ही मालिका अंत्यत महत्त्वाची अशी आहे. या मालिकेतील सर्व सामने टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार, सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार, ही अशी सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. मालिकेतील सर्व सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. पहिला सामना पंजाब, दुसरा सामना इंदूर आणि तिसरा अखेरचा सामना हा राजकोट इथे होणार आहे. दोन्ही संघाची आधीच घोषणाही करण्यात आलीय. त्यानुसार ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. तर केएल राहुल पहिल्या 2 सामन्यात तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा नेतृत्व करणार आहे.
या मालिकेपासून वायकॉम 18 च्या कराराची सुरुवात होणार आहे. त्यानुसार आता भारतात होणाऱ्या टीम इंडियाच्या द्विपक्षीय मालिकांचं प्रक्षेपण पुढील 5 वर्षांसाठी वायकॉम 18 ग्रुपच्या नेटवर्कवर पाहता येणार आहेत. तसेच मोबाईलवर लाईव्ह सामने हे जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येणार आहेत.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
पहिला एकदिवसीय सामना, शुक्रवार 22 सप्टेंबर, आयएस बिंद्रा स्टेडियम.
दुसरा एकदिवसीय सामना, रविवार 24 सप्टेंबर, होळकर स्टेडियम, इंदूर.
तिसरा एकदिवसीय सामना, बुधवार 27 सप्टेंबर, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम.