मोहाली | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी रविवारी 17 सप्टेंबरला टीम जाहीर केली. तर बीसीसीआयने सोमवारी 18 सप्टेंबरला भारतीय संघ जाहीर केला. त्यानुसार पहिल्या 2 सामन्यांमध्ये केएल राहुल कर्णधार आणि रवींद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे. या मालिकेला शुक्रवार 22 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. टीममधून 2 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या वनडेच्या 24 तासांआधी वाईट बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचे 2 मॅचविनर हे दुखापतीमुळे पहिल्या वनडेतून बाहेर पडले आहेत. पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याने पत्रकार परिषद घेतली.या दरम्यान पॅटने पहिल्या सामन्यात हे दोघे खेळणार नसल्याची माहिती दिलीय. ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे दोघे दुखापतीमुळे खेळणार नसल्याचं पॅटने सांगितलं.
ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क दोघे दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं पॅटने स्पष्ट केलं. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जोखीम नको म्हणून ऑस्ट्रेलियाने या दोघांना न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पॅटने स्टीव्हबाबतही माहिती दिली. “स्टीव्हन स्मिथ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. तो पूर्णपणे फीट आहे. त्याची मनगटाची दुखापत बरी झाली आहे.”, अशी माहिती पॅटने पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
Pat Cummins will be without two of his star players for the start of the three-match ODI series against India 👀
More 👇
— ICC (@ICC) September 21, 2023
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.
वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.