मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत मोठी अपडेट दिली आहे.
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी दुसऱ्या कसोटीनंतर लगेचच भारतीय संघाची घोषणा केली होती. यामध्ये बीसीसीआयने रोहित शर्मा पहिल्या वनडेत कॅप्टन्सी करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
रोहित पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं होतं. रोहित वैयक्तिक कारणामुळे पहिल्या वनडेत खेळणार नाही. यामुळे त्याच्या जागी हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबई, दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम तर तिसरा आणि शेवटची मॅचही 22 मार्चला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.
दरम्यान टीम इंडियासाठी अहमदाबादमधील चौथा कसोटी सामना हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने ‘करो या मरो’ असा आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर नागपूर आणि दिल्ली कसोटीत शानदार विजय मिळवला. मात्र इंदूरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची प्रतिक्षा आणखी लांबली.
आता टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचायचं असेल, तर चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल. नाहीतर टीम इंडियाचं भवितव्य हे जर तरच्या समीकरणावर असेल. यामुळे टीम इंडिया चौथ्या कसोटीत सामना जिंकत फायनलचं तिकीट कन्फर्म करते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.