Virat Kohli | विराट कोहली याच्या त्या कृतीने नेटकरी संतापले, म्हणाले…

| Updated on: Mar 23, 2023 | 10:20 PM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या. मात्र यानंतरही त्याला सोशल मीडियावर संतापाचा सामना करावा लागला आहे. नक्की काय झालंय, हे आपण जाणून घेऊयात.

Virat Kohli | विराट कोहली याच्या त्या कृतीने नेटकरी संतापले, म्हणाले...
Follow us on

चेन्नई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 2-1 च्या फरकाने हरवत सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. मात्र कांगारुंनी टीम इंडियावर एकदिवसीय मालिकेत 1-2 अशा अंतराने विजय मिळवत कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेतला. यासह कांगारुंनी भारत दौऱ्याचा शेवट गोड केला. वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कांगारुंनी जोरदार मुंसडी मारत 10 विकेट्सने विजय साजरा केला, तसेच मालिकेत बरोबरी साधली.

त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक ठरला. तिसरा सामना हा रंगतदार झाला. शेवटच्या काही ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात कांगारुंनी 21 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली. चेन्नईत ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करताना 269 धावा केल्या. यामुळे टीम इंडियाला 270 धावांचं आव्हान मिळालं. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक धावा केल्या. विराटने 72 चेंडूमध्ये 2 चौके आणि 1 सिक्स ठोकत 54 धावांचं योगदान केलं. विराटशिवाय हार्दिक पंड्या याने 40 तर सलामीवीर बॅट्समन शुबमन गिल याने 37 धावा केल्या.

टीम इंडियाला या पराभवामुळे मालिका गमावली. इतकंच नाही, तर आयसीसी वनडे रँकिंगमधील अव्वल स्थानही गेलं. या मालिका पराभवानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. विराटने केलेली ती एक कृती नेटकऱ्यांना काही पटलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला काही चाहते हे त्याच्या पाठीशी आहेत.

नक्की काय झालं?

विराट याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हीच्यासोबत फोटोशूट केलं आहे. अनुष्काने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर 13 हजार पेक्षा अधिकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या फोटोवर पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. मात्र काही क्रिकेटप्रेमी नाराज आहेत.

अनुष्का-विराट फोटोशूट


एका नेटकऱ्याने तर कहरच केलाय. क्रिकेटवर लक्ष केंद्रीत कर या फोटो काढण्यात काहीच ठेवलेलं नाही, अशी कमेंट केलीय. तर दुसऱ्याने “आयपीएल येतोय या वेळेस प्लीज ट्रॉफी जिंकून दे”, असं म्हटलंय.

दरम्यान आयपीएलच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मोसमासाठी सर्व एकूण 10 संघांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आता या 16 व्या हंगामात 10 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी हंगामा पाहायला मिळणार आहे हे मात्र निश्चित.