टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा 6 ते 10 डिसेंबर दरम्यान एडलेड येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 1 डिसेंबरला कॅनबेरा येथे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्या सराव सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्यातून संघासाठी मोठा त्याग करत इतर संघांना मोठा आर्दश घालून दिला आहे. टीमसाठी त्याग करण्याची वेळ आल्यास स्वत:चाही विचार करु नये, हे रोहितने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. त्यामुळे रोहित सोशल मीडियावर सेल्फलेस कॅप्टन असं म्हटलं जात आहे.
रोहितने प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरूद्धच्या सराव सामन्यात स्वत:बाबत निर्णय घेत मोठा आदर्श घालून दिला आहे. टीम इंडियासाठी या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा सामना महत्त्वाचा आहे. रोहित त्याच्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनंतर भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. त्याआधी रोहितच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत सलामी दिली होती. पहिल्या डावात टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र दुसऱ्या डावात केएल आणि यशस्वी या दोघांनी विक्रमी सलामी भागीदारी केली. केएल आणि यशस्वीने टीम इंडियासाठी द्विशतकी आणि ऐतिहासिक सलामी भागीदारी केली. या जोडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
आता रोहित परत आलाय. त्यामुळे रोहित आणि यशस्वी ओपनिंग करणार, हे असं निश्चित होतं. तसेच दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सराव व्हावा म्हणून उभयसंघात मॅच खेळवण्यात येत आहे. मात्र या सामन्यात रोहित ओपनिंगला न येता तिसऱ्या स्थानी बॅटिंगला आला. त्यामुळे रोहित दुसऱ्या कसोटीत ओपनिंग करणार नसल्याचं स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तसेच यशस्वीसोबत ओपनिंगसाठी केएल सेट झाल्याने त्यालाच दुसऱ्या सामन्यातही सलामीला पाठवायचं हे, रोहितच्या या निर्णयावरुन स्पष्ट झालं आहे. रोहितने टीम इंडियाच्या फायद्यासाठी सराव सामन्यात त्याचं सलामीचं स्थान सोडलं आहे. आता रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यात कितव्या स्थानी बॅटिंगसाठी येतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर प्लेइंग ईलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), मॅट रेनशॉ, जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर (विकेटकीपर), चार्ली अँडरसन, सॅम कोन्स्टास, स्कॉट बोलँड, लॉयड पोप, हॅनो जेकब्स, महली बियर्डमन, एडन ओ कॉनर, जेम रायन आणि जॅक निस्बेट.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद कृष्णा, सिराज , आकाश दीप, हर्षित राणा, सर्फराज खान, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पडिक्कल.