नागपूर : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या मॅचवर घट्ट पकड मिळवली आहे. नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीच्या घातक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा बाजार 177 धावांवर आटोपला. सामन्यातील दुसऱ्या दिवशी कॅप्टन रोहित शर्मा याने शतक ठोकलं. तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोघांनी अर्धशतक केलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाकडे 144 धावांची आघडी होती. तर धावसंख्या 7 बाद 321 अशी स्थिती होती.
नागपूर कसोटीचा दुसरा दिवसातील शेवटचा सत्र टीम इंडियाच्या ऑलराउंडर्सच्या नावावर राहिला. रोहित शर्माला आऊट केल्यानंतर कांगारुंनी सुटकेचा निश्वास घेतला. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला गुंडाळण्याच्या तयारीत होती. मात्र जडेजा आणि अक्षर या दोघांनी कांगारुंचा चांगलाच समाचार घेतला.
अक्षर आणि जडेजा या दोघांनी अर्धशतक ठोकलं. यामुळे टीम इंडियाने 300 पार मजल मारली आणि दोघेही नाबाद परतले. जडेजाने 170 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या. तर अक्षर 102 बॉल खेळून 52 रन्सवर नॉट आऊट आहे.
टीम इंडिया चांगल्या स्थितीत पोहचल्यानंतर माजी ऑलराउंडर इरफान पठाण याने अक्षरसोबत संवाद साधला. तु आज जडेजासारखा फटकेबाजी करत होतास, असं इरफान अक्षरला म्हणाला. यावर अक्षर म्हणाला की “मी त्यावर लक्ष देत नाही. तसंही तो आमचा सीनियर आहे. तर मी त्याच्याकडे पाहूनच फटके मारायला शिकतोय.”
अक्षरच्या उत्तरावर इरफान पठाण याने प्रतिक्रिया दिली. “तु जरी जडेजाला सीनिअर बोलत असला तरी तो स्वत:ला लहान बाळ समजतो. यावर अक्षर म्हणाला, “त्याच्या अशा विचार केल्याने काय होणार आहे. तो तर काहीही विचार करु शिकतो. पण तो सीनिअर आहे तर सीनिअरच राहिल.”, असं बोलत अक्षरने विषय आटोपता घेतला.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.