मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये टीम इंडिया संकटात सापडली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. ऑस्ट्र्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं आहे. सलामीवीर रोहित शर्मा 13 शुबमन गिल 0 सुर्यकुमार यादव 0 आणि के. एल. राहुल 9 धावांवर एकट्या स्टार्कने माघारी पाठवलं.
शुबमन आणि सूर्याला आज खातंही उघडता आलेलं नाही. हार्दिक पांड्या आणि विराटची जोडी जमली असं वाटलं अन् तितक्यात स्टीव्ह स्मिथने घेतलेल्या अफलातून कॅचने पांड्या बाद झाला. सेन एबॉच्या गोलंदाजीवर पांड्याने थर्ड मॅन बाऊंड्रीकडे पाठवण्यासाठी चेंडू कट केला पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मिथने हवेत उडी मारत कॅच घेतला.
Steve Smith ??pic.twitter.com/UmZVS7RErL
— ॓ (@Swati_bomb) March 19, 2023
नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला अनुभवी विराट कोहली आणि ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार रोहित शर्मा हा कॅच पाहून आचंबित झाले. स्टीव्ह स्मिथच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विराट कोहली याने एक बाजू लावून धरली आहे. मात्र त्याला दुसरीकडून साथ मिळताना दिसली नाही. या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियात एकूण 2 बदल करण्यात आले आहेत. कॅप्टन रोहित शर्मा याच्या कमबॅकमुळे इशान किशन याला बाहेर बसावं लागलं आहे. तर शार्दुल ठाकूर याच्या जागी अक्षर पटेल याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, मार्कस स्टोयनिस, नाथन एलिस, सेन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम झॅम्पा.