मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाची सुरुवात हवी तशी झाली नाही. आघाडीचे चार फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. ऋतुराज गायकवाडही मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने सर्व प्रेशर मधल्या फळीच्या जितेश शर्मा आणि रिंकू सिंह यांच्यावर आले. पण या दोघांनी चांगली खेळी करत टीम इंडियाला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला. पण सामन्यात एक वेळ अशी आली की पंचांना जितेश शर्मा याची माफी मागावी लागली. ऑस्ट्रेलियाने 15 षटक ख्रिस ग्रीनकडे सोपवलं. तेव्हा टीम इंडियाच्या 4 गडी बाद 115 धावा झाल्या होत्या. स्ट्राईकला रिंकू सिंह होता आणि आवश्यक पार्टनरशिप उभारण्यास मदत झाली. ख्रिस ग्रीनच्या पहिल्या चेंडूवर रिंकू सिंहने एक धाव घेत जितेश शर्माला स्ट्राईक दिली.
दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माने उत्तुंग षटकार ठोकला. तिसरा चेंडू ग्रीन फुल टॉस टाकला. हा चेंडू जितक्या जोरात होईत तितक्या जोरात जितेशने मारला. पण चेंडू थेट समोर असलेल्या पंचांच्या दिशेने गेला. चेंडूचा वेग इतका जबरदस्त होता की पंचांना जागेवरून हलण्याची संधी मिळाली नाही. पंचांनी हाताने चेंडू अडवत स्वत:चा बचाव केल्या. खरं तर या चेंडूवर दोन धावा तर सहज शक्य होत्या. पण या परिस्थितीमुळे एकही धाव मिळाली नाही. त्यामुळे पंचांनी हात दाखवत माफी मागितली. त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारत जितेशने भरपाई केली.
Umpires are the real Panauti for Indian team.
All the time umpire's call go against India as we see in World Cup also. But well played Jitesh Sharma#SalaarTrailer#Prabhas
Other cricket stats – https://t.co/8WIpg0uyIM pic.twitter.com/I779VFEOyV— FOMOcracy 💯💯FollowBack💯🆗 (@Rishavts) December 1, 2023
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), बेन ड्वार्शुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान, मुकेश कुमार.