मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली होती. एकूण 3 सामन्यांची ही सीरिज होती. टीम इंडियाने ही मालिका 2-1 फरकाने जिंकली. त्यानंतर 13 वा वर्ल्ड कप पार पडला. त्यानंतर आता पुन्हा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. यावेळेस उभयसंघात टी 20 मालिका होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. टीम इंडियाकडून या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर नुकतंच वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्याांना विश्रांती देण्यात आली आहे.
सूर्यकुमार यादव याला कांगारुं विरुद्ध टीम इंडियाची सूत्र देण्यात आली आहेत. तर मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असणार आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळत होते. मात्र आता ही टी 20 मालिका मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार नाही. त्यामुळे आता ही सीरिज मोबाईल तसेच टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहता येईल, हे सर्व जाणून घेऊयात.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व टी 20 सामने हे जिओ सिनेमा एपवर पाहता येतील. क्रिकेट चाहत्यांना एकूण 11 भाषांमध्ये कॉमेंट्रीचा आनंद घेता येणार आहे. तसेच टीव्हीवर ही मालिका कलर सिनेप्लेक्स या चॅनेलवर पाहता येईल. या चॅनेलवर हिंदी भाषेत कॉमेंट्री होणार आहे. तर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेलवरही सामना पाहता येईल. इंग्लिश, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेत कॉमेंट्री होणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिज
🚨 𝙎𝙦𝙪𝙖𝙙 𝘼𝙡𝙚𝙧𝙩 🚨
Here’s how both the sides look ahead of #IDFCFirstBankT20ITrophy, starting Nov 2️⃣3️⃣, LIVE only on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 🎬
*Shreyas Iyer will be available for the last two T20Is.#INDvAUS pic.twitter.com/UbdGI8oXMi
— Sports18 (@Sports18) November 21, 2023
दरम्यान ही मालिका 23 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना हा विशाखापट्टनम येथील डॉ वाय एस राजशेखरा रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तर अंतिम सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेतील एकूण 5 सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.