बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना ड्रॉ झाला आणि 1-1 अशी बरोबरी साधली गेली. त्यामुळे चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कोनस्टासच्या रुपाने डाव टाकला. नॅथन मॅकस्वीनीच्या जागी सॅम कोनस्टासला संधी दिली. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात सॅम कोनस्टासने आपली चमक दाखवली. जसप्रीत बुमराहला दोन षटकार मारत आपला दम दाखवला. पण सॅम कोनस्टासला डिवचण्यासाठी विराट कोहलीने त्याला खांद्याने धक्का मारला. त्यामुळे काही काळ मैदानात तणावाचं वातावरण होतं. सॅम कोनस्टासने या सामन्यात 65 चेंडूत 60 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकार मारले. 92.31 च्या सरासरीने धावा केल्या. पण इतर तीन डावात मात्र त्याची बॅट हवी तशी चालली नाही. भारतीय खेळाडूंनी त्याला जितकं दाबता येईल तितकं दाबण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीने मारलेल्या धक्क्याचं प्रकरण काही थांबता थांबत नाही. या प्रकरणी आता सॅम कोनस्टास स्वत: व्यक्त झाला आहे.
‘विराट कोहलीचे पाय जमिनीवर आहेत. त्याचा स्वभाव खूपच मनमोकळा असून त्याच्याशी मी सामना संपल्यानंतर बोललो. तसेच प्रेरणास्त्रोत असल्याचंही सांगितलं.त्याने मला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीलंका दौरा माझ्यासाठी चांगला असेल असं त्याने सांगितलं. पण मी संघात असलो तर..’, असं कोनस्टासने सांगितलं. ‘माझं कुटुंब विराट कोहलीवर प्रेम करते. मी क्रिकेटचे धडे गिरवताना त्याला आदर्श मानलं आहे. तो एक महान खेळाडू आहे.’, असंही कोनस्टास पुढे म्हणाला.
Sam Konstas said “Virat Kohli was very down to earth. A lovely person and I had a little chat after the game, telling him that I idolise him – wishing me all the best saying hopefully I go well on the tour of Sri Lanka he said if I’m in”. [CODE Sports] pic.twitter.com/UbUYAXPAiE
— Johns. (@CricCrazyJohns) January 8, 2025
बुमराह प्रकरणावरही सॅम कोनस्टासने आपलं मत मांडलं. ‘मला अजून थोडा काळ घालवायचा होता. कारण त्यामुळे दुसरं षटक टाकता आलं नसतं. पण बुमराहने सर्व रणनिती उधळून लावली. तो दिग्गज खेळाडू आहे. त्याने 32 विकेट एका मालिकेत घेतल्या आहेत. जर तेच पुन्हा घडलं तर मी कदाचित काहीच बोललो नसतो.’ दरम्यान, पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नाही. तसेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्याला आराम देण्याची शक्यता आहे. आता बुमराह थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल.