INDvsAUS | टीम इंडियाचा खेळाडू रुग्णालयात दाखल, मोठ्या काळासाठी क्रिकेटपासून दूर

| Updated on: Feb 16, 2023 | 6:53 PM

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

INDvsAUS | टीम इंडियाचा खेळाडू रुग्णालयात दाखल, मोठ्या काळासाठी क्रिकेटपासून दूर
Follow us on

मुंबई : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना हा 17-21 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये खूप घाम गाळला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी आली आहे. टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं आहे.

दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला दुखापतीमुळे अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या खेळाडूवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

हे सुद्धा वाचा

 

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे.प्रसिद्धला स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे फार त्रास सहन करावा लागतो. मात्र प्रसिद्धवर श्स्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्रसिद्धने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. प्रसिद्धने स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. “अनेक सामन्यांना मुकावं लागणार असल्याने मी दु:खी आहे. लवकरच परतेन”, असं कॅप्शन प्रसिद्धने या फोटोला दिलं आहे.

प्रसिद्धची आकडेवारी

प्रसिद्धने आयपीएलमधील कामगिरीने निवड समितीवर आपली छाप सोडली. आयपीएलध्ये कोलकातासाठी खेळताना टीम इंडियात त्याची निवड करण्यात आली. प्रसिद्ध दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. प्रसिद्ध अखेरचा सामना हा 2022 मध्ये झिंबाब्वे विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून प्रसिद्धला टीममध्ये कमबॅक करता आलेलं नाही.

प्रसिद्धने 14 वनडे सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये प्रसिद्धने 25 विकेट्स घेतल्या आहे. प्रसिद्धची 25 धावा देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

दरम्यान टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दिशेने एक पाउल पुढे टाकलय. त्यामुळे आता टीम इंडियाचा दुसरा सामना जिंकून विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, केएस भरत, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.