बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 181 धावा केल्या आणि भारताला 4 धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात भारातने 157 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाने 162 धावांचं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात स्टीव्ह स्मिथचं एक स्वप्न एक धावेने अपूर्ण राहिलं. खरं तर शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला कसोटीत 10 हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधी होती. पण तसं काही होऊ शकलं नाही. पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ 57 चेंडू 33 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात त्याला 10 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी 5 धावांची गरज होती. पण 4 धावांवर असताना प्रसिद्ध कृष्णानेला तंबूत पाठवलं आहे. त्याचं 10 हजार धावांचं स्वप्न एका धावेने हुकलं. स्टीव्ह स्मिथच्या आता कसोटी 9999 धावा झाल्या असून श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत 10 हजार धावांचा पल्ला गाठेल यात काही शंका नाही.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे ही केवळ औपचारिक मालिका आहे. दोन्ही सामन्यात पराभव आणि चुकून स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलिया गुण कापले तर भारताला संधी मिळू शकते. पण हे गणित काही शक्य नाही. दरम्यान, स्टीव्ह स्मिथने खंत व्यक्त केली आहे. ‘एक धावेमुळे मला त्या दिवशी खरंच खूप वेदना झाल्या. जर माझ्या कुटुंब आणि मित्रांसमोर घराच्या मैदानावर आनंद साजरा करता आला तर जास्त मजा आली असती. मला विश्वास आहे श्रीलंकेविरुद्धच्या गाल्ले येथील पहिल्या कसोटीत ते शक्य होईल.’
स्टीव्ह स्मिथ 114 कसोटी सामन्यात 204 डावात खेळला आहे. यात त्याने 9999 धावा केल्या आहेत. यात 34 शतकं आणि 41 अर्धशतकांचा समावेश आहे. यात 4 द्विशतकं आहेत. सँडपेपर प्रकरणामुळे स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करता आलं नव्हतं. पण सात वर्षानंतर त्याला ही संधी मिळाली आहे. पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने स्टीव्ह स्मिथ श्रीलंका दौऱ्या टीमचं नेतृत्व करणार आहे.