बिनोनी | अंडर 19 वर्ल्ड कप फायनल 2024 सामन्यात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने पहिली विकेट झटपट गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला तिसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या विकेटसह टीम इंडियावर आणखी दबाव तयार केला. कॅलम विडलर याने याने टीम इंडियाच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
कॅलम विडलर याने टाकलेला बॉल अर्शीनने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला चाटून गेला आणि अर्शीन विकेटकीपर रायन हिक्स याच्या हाती कॅच आऊट झाला. अर्शीनने या स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने शतकही ठोकलं होतं. त्यामुळे महाअंतिम सामन्यात त्याच्यावर मोठ्या खेळीसह टीम इंडियाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी होती. मात्र अर्शीन अपेक्षेवर खरा ठरला नाही. अर्शीन 6 बॉलमध्ये 3 धावा करुन आऊट झाला.
टीम इंडियाने पहिलीच विकेट लवकर गमावल्याने दबावात होती. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्येच टीम इंडियाला दुसरा झटका लागलाच होता, मात्र नशिबाची साथ मिळाली. चौथ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चार्ली एंडरसन याच्या बॉलिंगवर मुशीर खान याला जीवनदान मिळालं. चार्लीने टाकेला बॉल मुशीरने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटला लागून स्लीपमध्ये गेला. स्लीपमध्ये असलेल्या हॅरी डिक्सन याने मुशीर खान याचा कॅच सोडला. कॅच सोडला तेव्हा मुशीर झिरोवर होता. मुशीरचा कॅच सोडल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. आता मुशीर या संधीचं किती सोन करतो, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर
टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.