IndvsAus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटीमध्ये भारत आता पराभवाच्या गर्तेत आहे. अवघ्या 75 धावा करून तिसरा सामना कांगारू आपल्या खिशात घालत मालिकेतील पहिला सामना जिंकणार आहेत. त्याआधी आज फलंदाजीला उतललेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी फार काही काळ टिकू दिलं नाही. स्टार बॉलर उमेश यादव याने 3 विकेट्स घेतल्या यातील घातक बॉल पाहून सर्वांनाच धक्का बसला.
ICYMI – ????? ???? ?????? in India for @y_umesh ?
What a ball that was from Umesh Yadav as he cleans up Mitchell Starc to grab his 100th Test wicket at home. #INDvAUS pic.twitter.com/AD0NIUbkGB
— BCCI (@BCCI) March 2, 2023
उमेश यादवला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळाली आहे. उमेशला संधी मिळताच पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियाचे 3 गडी बाद केले. उमेशनं फक्त 5 षटकं टाकत 12 धावा देऊन 3 गडी टिपले. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल स्टार्कला त्रिफळाचीत करत उमेशने भारतात 100 गडी बाद केले आहेत. यासह उमेश यादव माजी क्रिकेटपटू कपिल देव, जवागल श्रीनाथ, जाहीर खान आणि इशांत शर्मा यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. भारतात सर्वाधिक 219 विकेट घेत कपिल देव आघाडीवर आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.