चेन्नई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचव्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने 200 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी मोठी भूमिका बजावली. केएल राहुल याने मैदानात अखेपर्यंत नाबाद राहत सिक्स खेचत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. केएलने नाबाद 97 धावा केल्या. केएलंच शतक अवघ्या 3 धावांनी अधुर राहिलं. तर विराट कोहली याने 6 चौकारांच्या मदतीने निर्णायक 85 रन्स केल्या. विराटने या खेळीसह सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडत वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
विराट कोहली अधिकृत चेस मास्टर ठरला आहे. विराट कोहली टीम इंडियाकडून क्रिकेट विश्वात विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने याबाबतीत टीम इंडियाचा दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. विराटला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी सचिनला मागे टाकण्यासाठी 59 धावांची गरज होती. विराटने 59 वी धाव पूर्ण करत सचिनला मागे टाकलं.
विराट कोहली – 5 हजार 517 धावा.
सचिन तेंडुलकर – 5 हजार 490 धावा.
रिकी पॉन्टिंग – 4 हजार 186 धावा.
रोहित शर्मा – 3 हजार 983 धावा.
दरम्यान टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थान मिळवलं आहे. दरम्यान टीम इंडिया आता आपला पुढील सामना हा बुधवारी 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असणार आहे. अफगाणिस्तानने आपला पहिला सामना हा बांगलादेश विरुद्ध गमावला. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.