मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय फलंदाजी ढेपाळलेली दिसली. भारताचा डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. भारताच्या स्टार फलंदाजांनी कांगारूंच्या फिरकीसमोर सपशेल नांगी टाकली. कांगारूंनी पहिल्या दिवशी फलंदाजी करताना 4 विकेट्स गमावत 156 धावा केल्या. अशातच पहिल्या दिवशीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये विराट कोहली डान्स करताना दिसला आहे.
भारतीय संघाचा डाव संपल्यावर झाल्यावर फलंदाजीला कांगारू आले होते. सामन्याच्या दुसऱ्याच षटकामध्ये रविंद्र जडेजाने ट्रॅविस हेड याला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेन आणि सलामीवीर उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचायला सुरूवात केली होती. 13 व्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या 41 धावा झाल्या होत्या. लाबुशेन 31 चेंडूत 9 धावा आणि उस्मान ख्वाजा 38 चेंडूत 15 धावांवर खेळत होते. त्यावेळी कॅमेरा रोहित शर्माकडे जात त्यावेळी तो उदास असलेला दिसतो. कारण मागच्याच षटकात भारतीय संघाने डीआरएस गमावला होता. लगेचच कॅमेरा कोहलीकडे गेला तेव्हा तो नाचताना दिसला.
pic.twitter.com/wnTJiooL9L
Virat Kohli Dance Video#IndvsAus— Nitin Kumar (@NitinKu29561598) March 1, 2023
विरोधी संघावर बॅटनेच नाहीतर आपल्या आक्रमक स्वभावातूनही कोहली मैदानात आक्रमण करताना दिसतो. बॅटींग असो किंवा फिल्डिंग कोहली कुठेच कमी नसतो. मात्र गेल्या नोव्हेंबर 2019 पासून एकही कसोटी शतक कोहलीने झळकावलेलं नाही.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.