मुंबई : भारतीय संघातील रन मशीन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहली आपल्या पहिल्या फॉर्ममध्ये परतला आहे. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराटने अर्धशतक ठोकत संघासाठी महत्त्वाची खेळी केली आहे. कोहलीने तिसऱ्या दिवशी फलंदाजीला येत नाबाद 59 धावा केल्या आहेत. विराट कोहली मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा बाद झाले होते. आल्यावर कोहलीने वेळ घेतला आणि अंदाज घेतल्यावर आपली ताकद दाखवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कला एकाच ओव्हरमध्ये दोन चौकार मारले. याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
विराट कोहलीने आल्यावर 35 पेक्षा जास्त चेंडू घेतले आणि 73 व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्क बॉलिंग करत होता. पहिले तीन चेंडू निर्धाव गेले आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने स्ट्रेट ड्राइव्ह मारत एक चौकार मारला नंतर त्याच ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार लगावला. विराटच्या या चौकारांनंतर स्टेडिअममधील प्रेक्षक आनंदाने नाचू लागले.
पाहा व्हिडीओ-
? @imVkohli ? Mitchell Starc
Quality shots on display ??#TeamIndia ?? | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/4J9vHV9GGm
— BCCI (@BCCI) March 11, 2023
भारताचा कर्णधार रोहित शर्मा 35 धावा करून बाद झाला आहे. त्यानंतर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराही फारशी चमक दाखवू शकला नाही. 42 धावा करून तो बाद झाला, चांगल्या सुरूवानंतरही त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. शुभमन गिल शतक करून 128 धावांवर बाद झाला. विराट आणि जडेजा आाता मैदानात आहेत.
विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यातील 50 धावांची भागीदारी पूर्ण केली होती. मात्र 128 धावांवर असताना नाथन लायने गिलला बाद करत हो जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने सावध सुरूवात केली असून तो नाबाद 16 धावा आणि विराट नाबाद 59 धावांवर खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारत अजुनही 191 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने 3 विकेट्स गमावत 289 धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.