WTC Final 2023 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाअंतिम सामन्याआधी मोठा बदल

| Updated on: Jun 06, 2023 | 11:18 PM

World Test Championship Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया सज्ज आहेत. मात्र त्याआधी मोठा बदल झाला आहे.

WTC Final 2023 | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील महाअंतिम सामन्याआधी मोठा बदल
Follow us on

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यासाठी सर्व तयारी झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सज्ज आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आतापर्यंत नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. आता मोजून काही मिनिटं या सामन्यासाठी शिल्लक आहेत. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळण्याची सलग दुसरी वेळ आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच wtc final मध्ये पोहचली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाची धुरा आहे. सामन्याची सर्वकाही तयारी झाली असतानाच आता मोठा बदल झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसह दोन्ही संघांना मोठा झटका लागला आहे.

नक्की काय झालंय?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याला अर्धा तास आधी सुरुवात होणार आहे. त्यामुळेच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे. इंग्लंडमध्ये सर्वसाधारणपणे कसोटी सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होते. इंग्लंडमधील सकाळचे 11 म्हणजे भारतातील दुपारचे 3 वाजून 30 मिनिटं. मात्र आता हा सामना अर्धा तासआधी सुरु होणार आहे.त्यामुळे भारतात या सामन्याला दुपारी 3 इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

सामना लवकर सुरु झाल्याने कुणाला फायदा?

सामना अर्धा तास सुरु होणार असल्याने त्याचा फायदा कुणाला होणार असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता या निर्णयाचा फायदा फक्त नि फक्त गोलंदाजांना होणार आहे. सामना लवकर सुरु होणार म्हणजे हवेत आणखी थंडावा असणार. यामुळे गोलंदाजांना बॉल स्विंग करण्यात मदत होईल. त्यामुळे या सामन्यातील पहिल्या सत्रात फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता या निर्णयाचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाल होतो, हे काही तासातच स्पष्ट होईल.

हे सुद्धा वाचा

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.