लंडन | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामना हा राखीव दिवशी निकाली निघाला. रविवारी 28 मे रोजी या महाअंतिम सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसपास परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सामना राखीव दिवशी 29 मे रोजी खेळवण्यात आला. त्यादिवशीही पाऊस झाला. यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार सामना 15 ओव्हर्सा झाला. चेन्नईने 171 धावांचं आव्हान हे 15 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. अशा प्रकारे हा फायनल मुकाबल्याचा निकाल 30 मे रोजी लागला.
आता आयपीएलची सांगता झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलकडे लागलंय. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस आहे. या राखीव दिवसाचा वापर या सामन्यात कोणत्या परिस्थितीत आणि कसा केला जाईल, हे आपण जाणून घेऊयात.
आयसीसीने या महामुकाबल्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केली आहे. आयसीसीनुसार, सामन्यादरम्यान पाऊस आला, निर्धारित षटकांचा खेळ न झाल्यास तसेच शेवटच्या दिवसापर्यंत गेम गेला आणि इतकं सर्व होऊनही निकाल निघाला नाही, तरच अंपायर्सच्या परवानीनुसार राखीव दिवशी खेळ होईल. जर 5 दिवसांमध्ये सामन्याचा निकाल लागला, तर राखीव खेळ राखीव दिवशी होणार नाही.
राखीव दिवसाचा वापर तेव्हाच केला जाईल, जेव्हा प्रत्येक दिवसातील निर्धारित षटकांपेक्षा कमी खेळ झाला असेल. तसेच राखीव दिवसात तितक्याच षटकांचा खेळ होईल, जितका सामन्यांच्या दिवसात होऊ शकला नाही. आयसीसीनुसार, राखीव दिवसाबाबत सामनाधिकारी निर्णय घेतील. सामनाधिकारी वेळेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची माहिती दोन्ही संघांना देतील. तसेच राखीव दिवसात कशाप्रकारे खेळ होईल याची माहिती देतील. तसेच राखीव दिवस असणार की नाही, असल्यास किती वेळेसाठी असणार, याबाबतची माहिती पाचव्या दिवसाचा खेळ संपण्याच्या 1 तासाआधी सामनाधिकारी देतील.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.