Team India : रविवारी टीम इंडियाचे 2 टी 20i सामने, जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार?

| Updated on: Oct 03, 2024 | 4:47 PM

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट चाहत्यांना रविवारी 6 ऑक्टोबरला डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे. टीम इंडियाचे रविवारी 2 टी20i सामने होणार आहेत.

Team India : रविवारी टीम इंडियाचे 2 टी 20i सामने, जाणून घ्या किती वाजता सुरुवात होणार?
cricket stadium
Image Credit source: MPCAtweets X Account
Follow us on

टीम इंडियाने बांगलादेशचा मायदेशातील कसोटी मालिकेत 2-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नजमूल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना हा रविवारी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे रविवारी टीम इंडियाचे एकूण 2 सामने होणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना हा ग्वाल्हेर येथे होणार आहे. तर 6 ऑक्टोबरला होणारा दुसरा टी 20i सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाचा 6 ऑक्टोबर रोजी होणारा दुसरा सामनाही हा पुरुष संघाचा नसणार आहे. तर हा सामना वूमन्स टीम इंडियाचा असणार आहे. आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात 4 ऑक्टोबरला आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. तर 6 ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 6 ऑक्टोबरला हायव्होल्टेज मॅच होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर इंडिया-बांगलादेश सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकाच दिवशी टीम इंडियाचे 2 सामने पाहायला मिळणार आहेत.

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मनधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर)*, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील* आणि सजना सजीवन.

बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.

टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.