IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, दोघांचं पदार्पण

| Updated on: Oct 06, 2024 | 7:48 PM

India vs Bangladesh 1st T20I : कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हन.

IND vs BAN : टीम इंडियाचा बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, दोघांचं पदार्पण
suryakumar yadav ind vs ban toss 1st t20i
Follow us on

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला टी 20I सामना हा ग्वाल्हेर येथील न्यू माधवराव शिंदे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं तर नजमुल शांतो बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. भारताने टॉस जिंकला. कॅप्टन सूर्यकुमारने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण झालं आहे. टीम मॅनेजमेंटने मयंक यादव आणि नितीश रेड्डी या दोघांवर विश्वास दाखवत त्यांना पदार्पणाची संधी दिली आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू मुरली कार्तिक याने मयंक यादवला कॅप देऊन त्याला शुभेच्छा दिल्या. तर माजी विकेटकीपर पार्थिव पटेलने नितीश रेड्डीला टीम इंडियाची कॅप देत भारतीय संघातील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

वरुण चक्रवर्तीचं पुनरागमन

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याचं भारतीय संघात जवळपास 3 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. वरुणने त्याचा अखेरचा टी 20i सामना हा स्कॉटलँड विरुद्ध 5 नोव्हेंबर 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता इतक्या महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर वरुणला संधी मिळाली आहे.

दरम्यान टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबेला या मालिकेतून दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी संघात तिलक वर्मा याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये आज संधी देण्यात आलेली नाही.

भारताने टॉस जिंकला

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.