टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मायदेशात क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेश विरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बांग्लादेश पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत दौऱ्यात खेळण्यासाठी उत्सूक आहे. बांगलादेशच्या या दौऱ्याची सुरुवात आजपासून (19 सप्टेंबर) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होत आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर नजमुल हुसेन शांतो बांगलादेशची धुरा सांभाळणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. बांगलादेशने टॉस जिंकला आहे. कॅप्टन शांतोने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 साली रस्ते अपघात झाला होता. त्यानंतर पंतने जवळपास 2 वर्षांनी कसोटी संघात कमबॅक केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली याचंही जानेवारी 2024नंतर पुनरागमन झालं आहे. त्यामुळे या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा 14 वा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 13 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. 2 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. तर बांगलादेशला एकही सामनो जिंकला आलेला नाही. बांगलादेशची पाकिस्तान दौऱ्याआधी अशीच स्थिती होती. त्यांनी तोवर पाकिस्तान विरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नव्हता. मात्र बांगलादेशने इतिहास रचत पाकिस्तानला त्यांच्याच घरात 2-0 ने व्हाईटवॉश केला. त्यामुळे बांगलादेश टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते, याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
बांगलादेश टॉसचा बॉस
🚨 Toss Update from Chennai
Bangladesh have elected to bowl against the @ImRo45-led #TeamIndia in the first #INDvBAN Test!
Follow The Match ▶️ https://t.co/jV4wK7BOKA @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bbzAoNppiX
— BCCI (@BCCI) September 19, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.