ind vs ban 1st Test : याला आवरा रे, रोहित शर्मा याची पुन्हा एकदा गार्डन स्टाईलमध्ये शिवी, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Sep 21, 2024 | 7:14 PM

CaptainRohit Sharma Stump Mic Video : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा कसोटीवेळी शिवी देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भर मैदानात तो खेळाडूवर भडकला आणि त्याने शिवी दिली. व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

ind vs ban 1st Test : याला आवरा रे, रोहित शर्मा याची पुन्हा एकदा गार्डन स्टाईलमध्ये शिवी, व्हिडीओ व्हायरल
Follow us on

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या कसोटीमध्ये फेल ठरला आहे. दोन्ही डावांमध्ये त्याला दुहेरी धावसंख्य करता आली नाहीत. पहिल्या डावामध्ये ६ तर दुसऱ्या डावात ५ धावा काढून परतला. मात्र तरीही सोशल मीडियावर रोहित शर्मा याची चर्चा होत आहे. याचे कारण म्हणजे रोहितचा आवाज मैदानावरील स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे.

रोहित शर्माची कॅप्टनसीची शैली वेगळी वेगळी आहे. रोहित आक्रमक नाही पण वेळ पडली तर तो मागचा पुढचा विचार न करता रागावतो. पण त्यानंतर त्या खेळाडूच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सोड रे, ते मॅचपुरतं होतं असं म्हणत खेळाडूचं मानिसक खच्चीकरण होऊ देत नाही. आता मागील कसोटीमधील त्याचा गार्डनमध्ये फिरायला आलात का हे बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशाच प्रकारे बांगलादेशविरूद्धच्या कसोटीमध्येही घडलं आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान रोहित शर्मा एका खेळाडूवर चिडलेला दिसला. तो म्हणाला, ‘अरे सगळे झोपले आहेत.’ मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा कोणावर ओरडत आहे हे स्पष्ट झालेले नाही. यामध्ये रोहितने शिवी दिल्याने त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यातील तीन दिवस झाले आहेत. टीम इंडिया मजबूत स्थितीत असून बांगलादेशला जिंकण्यासाठी 357 धावा तर तर टीम इंडियाला सहा विकेट्सटची गरज आहे. तिसऱ्या दिवशी शुबमन गिल आणि रिषभ पंत यांनी शतके करत  टीम इंडियाला भक्कम स्थितीत पोहोचवले. आता बांगलादेशच्या फलंदाजांची खरी कसोटी असणार आहे. खराब लाईटमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला,  बांगलादेशच्या 158-4 धावा झाल्या आहेत.

बांगलादेश प्लेइंग 11 : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.