टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने विश्वासाने एका खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान दिलं. मात्र त्या फलंदाजाने कॅप्टन रोहितला चुकीचं ठरवलं. रोहितने या खेळाडूला संधी देऊन आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने पहिल्याच तासात कॅप्टन रोहित, शुबमन गिल आणि विराट कोहली या 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. टीम इंडिया अडचणीत असताना या खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्या खेळाडूला टीम इंडियाला अडचणीतून काढता आलं नाही.
कॅप्टन रोहितने बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा जावई केएल राहुल याला संधी देऊन चूक केली की काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. केएल सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला.केएलला सहाव्या स्थानी खेळवण्याचा प्रयोग फसला. केएल सहाव्या स्थानी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. केएलने 52 बॉलमध्ये 16 धावा केल्या. मेहदी हसन मिराज याने केएल राहुल याला आऊट केलं. केएलला ठिकठाक सुरुवात मिळाली होती.तसेच टीम इंडिया अडचणीत असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र केएल रोहितच्या विश्वासावर खरा उतरण्यात अपयशी ठरला.
दरम्यान केएलला कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजुला केएलला चांगली सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश येत असल्याचं त्याच्या 5 डावातील आकड्यावरुन स्पष्ट होतंय. केएलने कसोटीतील गेल्या 5 डावात अनुक्रमे 4,8,86,22 आणि 16 अशा धावा केल्या आहेत.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.