IND vs BAN : टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टन Rohit Sharma आऊट

| Updated on: Sep 20, 2024 | 4:09 PM

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही अपयशी ठरला आहे. रोहित झटपट आऊट झाल्याने टीम इंडियाला ठोस अशी सुरुवात मिळू शकली नाही.

IND vs BAN : टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टन Rohit Sharma आऊट
rohit sharma ind vs ban
Follow us on

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा हा बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही झटपट आऊट झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाची अपेक्षित अशी सुरुवात होऊ शकलेली नाही. रोहित पहिल्या डावात 6 धावांवर आऊट झाला होता. त्यामुळे रोहितकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची आशा होती. मात्र रोहित स्वस्तात माघारी परतल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. आता भारतीय चाहत्यांना रोहितच्या बॅटिंगसाठी दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला 227 तगडी आघाडी मिळाली. मोठी आघाडी मिळाल्याने भारताची सलामी जोडी कोणत्याही दबावाखाली न येता बिंधास्तपणे खेळतील, अशी अपेक्षा होती. मात्र रोहितने पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही स्वस्तात आपली विकेट टाकली. रोहितला दुसऱ्या डावात तास्किन अहमद याने टीम इंडियाच्या डावातील 3 ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर झाकीर हसन याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहित 7 बॉलमध्ये 1 फोरसह 5 रन्स करुन माघारी परतला. रोहितने अशाप्रकारे पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 11 धावा केल्या.

दरम्यान टीम इंडियाने आर अश्विन-रवींद्र जडेजा या दोघांनी सातव्या विकेटसाठी 199 धावांची भागीदारी केली. भारताने या जोरावर पहिल्या डावात 376 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर टीम इंडियाने बांगलादेशला 149 धावांवर गुंडाळून 227 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडिया बांगलादेशला किती धावांचं आव्हान देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

रोहित शर्मा दुसऱ्या डावातही अपयशी

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.