नितीश रेड्डीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला सामना काही खास गेला नव्हता. पण दुसऱ्या सामन्यात नितीश कुमार रेड्डीचं वादळ दिल्लीकरांना अनुभवता आलं. पॉवर प्लेमध्ये अवघ्या 41 धावांवर 3 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास अडचण येईल असं वाटतं होतं. संजू सॅमसन 10, अभिषेक शर्मा 15, तर कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त 8 धावा करून बाद झाले होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दडपण आलं होतं. हे दडपण दूर करण्यासाठी रिंकु सिंह मैदानात उतरला आणि आक्रमक पवित्रा दाखवला. त्याचं वारं नितीश रेड्डी लागलं आणि वादळी खेळीची अनुभूती क्रीडारसिंकांना मिळाली. नितीश रेड्डीने 34 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांच्या मदातूने 74 धावा केल्या. त्याने 217.65 च्या सरासरीने या धावा केल्या. त्याची ही खेळी पाहून क्रीडारसिकही खूश झाले. नितीशने मिराजच्या षटकात तर धुमाकूळ घातला. एका षटकात 24 धावा ठोकल्या. खरं तर या षटकात एकूण 26 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर रिंकु सिंहने एक धावा घेत नितीशला स्ट्राईक दिली.
मिराजच्या दुसऱ्याच चेंडूवर नितीश रेड्डीने उत्तुंग षटकार मारला. मिडविकेटवरून त्याने हा फटका मारला होता. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. चौथ्या चेंडूवर दोन धावा घेत स्ट्राईक ठेवली. पाचव्या चेंड़ूवर नितीशचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्याने पुन्हा एकदा षटकार मारला. मिराजने शेवटचा चेंडू टाकताना चूक केली आणि वाइड गेला. मग सहाव्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारला. असं करत या षटकात एकूण 26 धावा आल्या पण नितीशच्या खात्यात 24 धावा गेल्या.
नितीश रेड्डी हा कमी वयात 50 धावा करणारा टी20 क्रिकेटमधील भारताचा चौथा फलंदाज आहे. रोहित शर्मा या यादीत पहिल्या स्थानावर आहे. 20 वर्षे आणि 143 दिवसांचा असताना रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 50 धावा केल्या होत्या. त्यानतर तिलक वर्माचा नंबर लागलो. त्याने 20 वर्षे आणि 271 दिवसांचा असताना वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. ऋषभ पंत या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 21 वर्षे आणि 38 दिवसांचा असताना त्याने 2018 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. तर नितीश रेड्डीने 21 वर्षे आणि 136 दिवसांचा असताना बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): परवेझ हुसैन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रिदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान