नितीश रेड्डी याच्यानंतर टीम इंडियाचा युवा फलंदाज रिंकू सिंह याने अरुण जेटली स्टेडियममध्ये बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या टी20i सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. रिंकूने 16 व्या व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. रिंकूच्या टी 20i कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठोकलं. रिंकूने नितीश रेड्डीपेक्षा वेगवान अर्धशतक झळकावलं. रिंकूने फक्त 26 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 203.85 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. मात्र रिंकुला अर्धशतकानंतर एकही धाव जोडता आली नाही. रिंकुने अर्धशतकानंतर 2 बॉल डॉट केले. तर तिसऱ्या बॉलवर तो आऊट झाला. रिंकू अशाप्रकारे 29 बॉलमध्ये 53 धावांवर बाद झाला.
त्याआधी नितीश रेड्डी याने 27 बॉलमध्ये त्याच्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक केलं. नितीश रेड्डी ज्या वेगाने खेळत होता त्यानुसार त्याला शतकाची संधी होती. मात्र नितीश तिथवर पोहचू शकला नाही. नितीशने 34 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 74 रन्स केल्या. नितीश आणि रिंकू सिंह या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. संजू 10, अभिषेक 15 आणि सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाल्याने टीम इंडियाची स्थिती 3 बाद 41 अशी स्थिती झाली होती. तिथून नितीश रेड्डी आणि रिंकू सिंह या जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी शतकी भागीदारी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी केली.
रिंकूने अर्धशतकानंतर काय केलं?
Rinku Singh departs after a solid knock of 53 off just 29 deliveries.
Watch his half-century moment here 👇👇
Live – https://t.co/Otw9CpO67y…… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/oWII6THYjt
— BCCI (@BCCI) October 9, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.