आकाश दीपच्या दोन षटकारामागे असं होतं गणित, विराट-रोहितसह गंभीरही झाला आवाक्

| Updated on: Sep 30, 2024 | 6:21 PM

वेगवान गोलंदाज आकाशदीपने पहिल्या डावात दोन गडी बाद करत आपली छाप सोडली. पण इतक्यावर थांबला नाही. जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली तेव्हा त्याने चमक दाखवली. दोन षटकार ठोकत कर्णधार रोहित शर्मा, रनमशिन विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्या दोन षटकारामागचं गणित आता कुठे समोर आलं आहे.

आकाश दीपच्या दोन षटकारामागे असं होतं गणित, विराट-रोहितसह गंभीरही झाला आवाक्
Image Credit source: video grab
Follow us on

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन दिवस पावसामुळे वाया गेले. असं असलं तरी चौथ्या दिवशी सामन्याची रंगत वाढली आहे. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 गडी गमवून 107 धावा केल्या होत्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ होईल असंच वाटत होतं. पण चौथ्या दिवशी लंच ब्रेकनंतर लगेचच बांगलादेशचा डाव आटोपला. बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. भारताला जिंकायचं तर या धावांचा पाठलाग करून आघाडी घेणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने भारताने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी चांगला स्टार्ट दिला. तर केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने 233 पार धावा नेण्यास मदत केली. मात्र त्यानंतर डाव गडगडला. भारताने 9 गडी बाद 285 धावांपर्यंत मजल मारली आणि डाव घोषित केला. भारताकडे 52 धावांची आघाडी होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 2 गडी बाद 26 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 26 धावांची आघाडी आहे. असं असताना आकाश दीपच्या दोन षटकारांची जोरदार चर्चा रंगली आहे. खेळपट्टीवर पाय ठेवताच आकाश दीपने 3 चेंडूत 2 षटकार मराले. या षटकारांचं विराट कोहलीशी खास कनेक्शन आहे.

विराट कोहलीने नुकतीच एक बॅट आकाश दीपला गिफ्ट दिली होती. त्यामुळे त्याला कानपूर कसोटी खेळण्याची संधी मिळताच तीच बॅट घेऊन उतरला. आकाश दीपने शाकिब अल हसनला दोन षटकार ठोकले. आकाश दीपची फटकेबाजी पाहून विराट कोहली खूश झाला. त्याच्यासोबत इतर दिग्गजही त्याच्या खेळीचा आनंद लुटत होते. दुसरीकडे, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर त्याच्या या शॉट्सचा रिप्ले पाहात होते.

भारताने पाचव्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली तर विजयाच्या आशा आहे. बांगलादेशच्या हातात अजूनही 8 विकेट आहेत. दुसरीकडे, भारताकडे अजूनही 26 धावांची आघाडी आहे. भारताने जर 150 धावांच्या आत बांगलादेशला रोखलं, तर विजय निश्चित होईल. त्यामुळे विजयाच्या सर्व आशा आता गोलंदाजांवर अवलंबून आहेत. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थान आणखी पक्कं होईल.