भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना सुरु होण्यास पावसामुळे दिरंगाई झाली. त्यानंतर नाणेफेकीचा कौल झाला आणि भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 35 षटकं टाकत 107 धावांवर 3 गडी बाद केले. मात्र पुन्हा एकदा खराब प्रकाशमानामुळे सामना थांबवण्यात आला. या सामन्यावर आधीच नैसर्गिक संकट ओढावलं आहे. दुसरीकडे, सामन्यात काही अक्रित घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. कारण बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतात प्रचंड राग आहे. इतकंच काय तर भारतात बांगलादेशने सामना खेळण्यास येऊ नये असंही काही संघटनांनी आवाहन केलं होतं. त्या अनुषंगाने कानपूरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असं असताना कानपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा सुपर फॅनची स्टेडियममधील फॅन्ससोबत तू तू मै मै झाली. यामुळे फॅन्स हाणामारीवर उतरले आणि भिडले. यात बांगलादेशचा सुपर फॅन असलेला टायगर रॉबी जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
बांगलादेशचा सुपर फॅन असलेल्या टायगर रॉबीने सांगितलं की ही घटना लंच ब्रेक दरम्यान झाली. टायगर रॉबी बांगलादेशच्या सर्व सामन्यांना प्रोत्साहित करण्याासटी मैदानात येत असतो. त्याच्या संपूर्ण शरीरावर वाघासारखे पट्टे मारलेले असतात. या वेशभूषेसह तो उपस्थितांचं लक्ष वेधून घेतो. कानपूर कसोटीतही या वेशभूषेसह टायगर रॉबी पोहोचला होता. रॉबीने सांगितलं की, ‘त्यांनी माझ्या पाठीवर आणि पोटाच्या खालच्या भागावर मारले. मला श्वासही घेता येत नाही.’
Bangladeshi fan Tiger Roby was beaten by some people.
– The Kanpur police took him to the hospital. pic.twitter.com/F3ZwKqvarM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
#WATCH | Uttar Pradesh: Members of VHP demonstrated in Kanpur earlier today over Team India’s Test Match with Bangladesh. They are protesting the scheduling of the match in wake of the attacks on Hindus and other minorities in Bangladesh recently. pic.twitter.com/IpoO9ZxxTk
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 27, 2024
टायगर रॉबीच्या आरोपानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. पोलिसांनी रॉबीच्या आरोपांची शहनिशा करण्यासाठी अधिकृत सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानंतर नेमकी घटना काय आहे? आणि काय घडलं ते समोर येईल.