टीम इंडियाने बांगलादेशला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने व्हाईट वॉश दिला. त्यानंतर टीम इंडिया 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाकडे बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याची संधी आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातून नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव या दोघांनी पदार्पण केलं. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात कोणताही बदल केला नाही. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
कॅप्टन सूर्यकुमार यादव संजू सॅमसन याला तिसऱ्या सामन्यातून डच्चू देऊ शकतो. संजू सॅमसनला इतर वेळेस संधी मिळत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जातं. मात्र आता संजूला 2 सामन्यात संधी मिळाली तर त्याला छाप सोडता आली नाही. संजूला या संधीचं सोनं करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20I मालिकेसाठी दावा मजबूत करता आला नाही. त्यामुळे संजूच्या जागी अमरावतीच्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजूला पहिल्या 2 सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. संजूने दोन्ही सामन्यात एकूण 39 धावा केल्या. संजूला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे आता संजूच्या जागी तिसऱ्या सामन्यात अमरावतीच्या जितेश शर्मा याचा समावेश केला जाऊ शकतो. आता कॅप्टन सूर्यकुमार संजूवर विश्वास दाखवत त्याला तिसऱ्या सामन्यातही खेळवणार की जितेशला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.