टीम इंडियाने बांगलादेशला टी20i मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे. टीम इंडियाने हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात बांगलादेशचा 133 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 164 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाने या विजयासह कसोटीनंतर आता टी 20i मालिकेतही पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे बांगलादेशला आता रिकाम्या हाताने मायदेशात परतावं लागणार आहे.
बांगलादेशकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. बांगलादेशकडून तॉहिद हृदाय याने सर्वाधिक धावा केल्या. हृदायने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने नॉट आऊट 63 रन्स केल्या. विकेटकीपर बॅट्समन लिटन दास याने 42 धावा केल्या. कॅप्टन नजमुल हुसेन शांतोने 14 धावांचं योगदान दिलं. तर तांझिद हसन याने 15 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांनी शरणागती पत्कारली. परवेझ इमॉन आणि रिशाद हौसेन या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर महेदी हसन याने 3 धावा केल्या. तांझिम हसन साकीबने 8 धावा जोडल्या. तर महमुदुल्लाह याने अखेरच्या टी 20i सामन्यात 8 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मयंक यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गामवून 297 धावा केल्या. भारतासाठी संजू सॅमसन याने 111 धावांची खेळी केली. कॅप्टन सूर्यकुमारने 75 धावा केल्या. हार्दिक पंड्याने 47 आणि रियान परागने 34 धावांचं योगदान दिलं. अभिषेक शर्मा याने 4 धावा केल्या. नितीश रेड्डी याला भोपळा फोडण्यात अपयश आलं. तर रिंकु सिंह 8 आणि वॉशिंग्टन सुंदर 1 धावा करुन नाबाद परतले. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच तास्किन अहमद, मुस्तफिजुर आणि महमुदुल्लाह या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक
A perfect finish to the T20I series 🙌#TeamIndia register a mammoth 133-run victory in the 3rd T20I and complete a 3⃣-0⃣ series win 👏👏
Scorecard – https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BdLjE4MHoZ
— BCCI (@BCCI) October 12, 2024
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.