कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया कप सुपर 4 मधील अखेरचा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकलाय. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने बॉलिंगचा निर्णय घेत बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या सामन्यात मोठे बदल केले आहेत.तसेच बांगलादेश टीमनेही अनेक बदल केले आहेत. दोन्ही टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी5 बदल करण्यात आले आहेत. टीम इंडिया आणि बांगलादेशने प्रत्येकी 1 खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.
टीम इंडियाकडून तिलक वर्मा याचं वनडे डेब्यू झालं आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने तिलकला टॉसआधी टीम इंडियाची कॅप देऊन त्याचं स्वागत केलं. यावेळेस टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड आणि सर्व खेळाडू उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनी तिलकचं वनडे डेब्यूसाठी अभिनंदन केलं आणि त्याला शुभेच्छा दिल्या. तर बांगलादेशकडून तांझिम हसन साकिब याने एकदिवसीय पदार्पण केलं आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेशचे 11 शिलेदार
Excitement is in the air as India wins the toss and elects to field first! 🇮🇳
Will their winning streak continue, or can the Tigers snatch their first victory in the Super 4s? 🐯Get ready for an enthralling contest that promises edge-of-the-seat action! 💪#AsiaCup2023 #INDvBAN pic.twitter.com/iWBHUTgvXn
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 15, 2023
टीम इंडियात या सामन्यासाठी अर्धा संघ बदलला आहे. विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तांझिद हसन, अनमूल बहक, तॉहिद हृदॉय, शमीम होसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तांझिम हसन शाकिब आणि मु्स्तफिजुर रहीम.